श्री.गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील भरले मत्स्य प्रदर्शन

Spread the love

पूर्णा ता.१(प्रतिनिधी) येथिल श्री.गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विविध माशांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे , सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदरावजी कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे डॉ. गजानन कुरुंदकर, कार्यालयालयीन अधीक्षक श्री बालासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती होती. बी.एस.सी.प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विदयार्थी आकांक्षा गर्ग, संजीवनी धुतराज, शुभांगी काकडे, पल्लवी काटकर,स्मिता कुरे, विनायक डुकरे, शिव साखरे,स्नेहा मोरे, प्रेरणा धुतराज,वैष्णवी कदम, आरती माने, राशीद कुरेशी या सर्व विदयार्थ्यांनी मासाच्या विविध जातींच्या माशाचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्यामध्ये Tiger barb,Black Molly,White Molly,Zebra fish,Angel fish,Surfy tetra,Pink Tetra,Purple Tetra,Silver Dollar, Guppy Fish या विविध जातीच्या माशांची विविध रंगांचे व आकारांचे मासे दाखवण्यात आले.मत्स्य प्रदर्शनाचा मुख्य उद्देश माशांच्या जीवनचक्राबद्दल , मत्स्यसंवर्धना विषयी माहिती व्हावी हाच होता. मत्स्य प्रदर्शनाला एकूण १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयातील 250 विद्यार्थ्यांनी मत्स्य प्रदर्शनास भेट दिली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन आकांक्षा गर्ग तर आभार शुभांगी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.रवी बरडे,डॉ.पल्लवी चव्हाण, डॉ.व्यंकट कदम यांनी केले . कार्यक्रमाला डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ.प्रकाश भांगे,डॉ.बालासाहेब मुसळे, डॉ. गंगाधर कापुरे, डॉ. शेषराव शेटे, भगू बायस, कालिदास वैद्य, गजानन भालेराव यांनी साहित्याची मांडणी उत्तम केली.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page