श्री.गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन…
पूर्णा ता.१३(प्रतिनिधी) Shri Gurubuddhiswami college Employment news महाराष्ट्र शासन
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.१९) रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माहिती प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी दिली आहे.

पुर्णा येथील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, नांदेड, परभणी येथील विविध क्षेत्रातील १० कंपन्या येणार आहेत.यामध्ये ३०० च्या वर जागांसाठी नौकरीची संधी उपलब्ध होणार आहेत.या रोजगार मेळाव्याला पूर्णा परिसरातील व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभागी होऊन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या वतीने प्रमोदअण्णा एकलारे, अमृतराज कदम, उत्तमरावजी कदम, गोविंदरावजी कदम प्राचार्य डॉ के.राजकुमार आदींनी आवाहन केले आहे.
महाविद्यालयाने या अगोदर ५ वेळा रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले असून बँकिंग क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर ७० पेक्षा जास्त विदयार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. याच दृष्टीकोणातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मध्ये दहावी पास, बारावी पास, पदवीधर झालेल्या जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी नावं नोंदणी करावी अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.राजकुमार यांनी दिली आहे.












