मा.आ.सितारामजी घनदाट झाले भाजपवासी

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी

गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार तथा अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सिताराम घनदाट (मामा) यांनी भाजप

आज मंगळवारी १८ मार्च रोजी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण( कार्यकारी प्रदेशाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले,माजी आमदार सिताराम घनदाट हे पुर्वाश्रमी भाजप ,नंतर अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस,आणी वंचित नंतर आता पुन्हा एकदा भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात होते.मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण( कार्यकारी प्रदेशाध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,मा.नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदकिशोर बलोरे अप्पा, सुरेशराव भुमरे युवा नेते, जिल्हाउपाध्यक्ष रवी जोशी, प्रशांत फड तालुकाध्यक्ष, पालम तालुकाध्यक्ष रुपेश अंकल शिनगारे, यांच्यासह असंख्य गंगाखेड विधानसभा येथील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी घनदाट मामा मित्र मंडळ येथील सर्व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे..

#गंगाखेड विधानसभा #DevendraFadnavis #BJPMaharashtra #MeghnaSakoreBordikar #SantoshMurkute,#ChandrashekharBawankule #Ravindra Chavan

You cannot copy content of this page