पूर्णा येथील यशवर्धन कु-हेचा स्केटिंगमध्ये जिल्हास्तरीय विजय
पुर्णा, ता.१५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग (इनलाईन) स्पर्धेत पूर्णा येथील विद्याप्रसारिणी शाळेचा खेळाडू यशवर्धन चंद्रकांत कु-हे याने विजय संपादन केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे यशवर्धनची शालेय विभागीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.संस्थेचे ऑडिटर सेक्रेटरी श्रीनिवासजी काबरा, संचालक डॉ. हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापक देविदास उमाटे तसेच जवाहरलाल नेहरू इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अतीया बेगम यांनी विजेत्या खेळाडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.यशवर्धनला क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील पातळीवरील स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करण्यासाठी सर्व स्तरांतून यशवर्धनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.