१० वर्षांच्या सोहमने साकारली ज्वारीपासून महामानवाची सुरेख कलाकृती
पूर्णेत बालकलाकारांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन
पूर्णा(प्रतिनिधी)
दहा वर्षांच्या सोहम लोखंडे या बालकाने कमी वयात ज्वारीच्या दाण्यापासुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक कलाकृती तयार करून जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.त्याच्या शाळेच्या शिक्षकांसह कलाप्रेमींतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव आहे.साजरा केला जात आहे.महामानवाला अभीवादन करण्यासाठी अनेक जणांनी जय्यत तयारी चालू केली आहे.पूर्णा शहरातील अलंकार नगरातील, कलाकृती , रांगोळी, पेंटींग मध्ये निपुण असलेले चुलते शिक्षक सुरेश लोखंडे यांच्याकडून कलेचा वारसा मिळवलेल्या येथिल अभिनव शाळेतील इयत्ता ४ थीत शिकणारा सोहम रमेश लोखंडे (वय १०) वर्षे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांंना अभिनव पद्धतीने अभिवादन करण्याचा चंग बांधला होता.त्याने ज्वारीच्या दाण्यांच्या वापर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सुरेख कलाकृती तयार केली आहे.त्यासाठी त्याला घरातील ज्वारी आणि इतर साहित्य यासाठी वीस रुपये खर्च आला. त्याने पाच तास अथक परिश्रम करून चुलते सुरेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कलाकृती तयार केली आहे. अगदी कमी वयात प्रोफेशनल कलाकारां प्रमाणे अवघ्या दहा वर्षांच्या सोहमने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुरेख कलाकृती नाकारल्याने सदरील कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
————————————————-
माझा मुलगा सोहम अशा नाना प्रकारच्या कलाकृती बनवण्याची आवड त्याला लहान वयापासूनच आहे.सोहमने घरी आई ज्वारीचे दळण करत असताना पाहिले आणि त्याच्या डोक्यात ज्वारीच्या दाण्यापासून एखादी कलाकृती तयार करावी अशी कल्पना सुचली.म्हणून त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औत्सुक्य साधून ही अभिनव अशी कला सादर केली.
-रमेश लोखंडे(पालक)