दरोडा घालून लुटमार करत अत्याचार करणा-या टोळीवर मोक्का..!
जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची कठोर कारवाई
परभणी(प्रतिनिधी)
परभणी तालुक्यातील मौजे पारवा शिवारातील एका शेत आखाड्यावर दरोडा घालून अमानुषपणे लुटमार करत अत्याचार करणा-या दरोडेखोरांच्या एका टोळीवर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी यांनी मोक्का कायद्यांतर्गत कठोर स्वरुपाची कारवाई केली आहे.
परभणी तालुक्यातील मौजे पारवा शिवारात दरोडेखोरांच्या टोळीने २ फेब्रुवारी २०२५ रोजी शेत आखाड्यावर राहणार्या कुटूंबियांवर दरोडा टाकून तेथील महिलेवर अत्याचार केला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणातील आरोपीस शोधून काढले. सदर आरोपीकडे तपास करीत असतांना चौकशी केली तेव्हा या आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या या कृत्याला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज होती. त्याकरीता मकोका संघटीक गुन्हेगारी प्रतिबंध कायदा अन्वये त्यांच्या विरुध्दचा प्रस्ताव नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तो त्यांनी मंजूर केला. त्यामुळे आता या आरोपींविरोधात मोक्का कायदा लावण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या नेतृत्वाव सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम हराळे, साईप्रकाश चन्ना, केंद्रे, चट्टे, भूजबळ, गणेश कौटकर, आगळे यांचा सहभाग असून संघटीत गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.