परळी वैजनाथ मार्गे काचीगुडा-नगरसोल-काचिगुडा विशेष रेल्वेच्या ८ फेर्‍या

Spread the love

परळी,ता.१७(प्रतिनिधी)

दक्षिण मध्य रेल्वेने परळी (वैजनाथ), परभणी, छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा दरम्यान आठ विशेष फेर्‍या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या ऑगस्ट महिन्यात दर गुरुवार आणि शुक्रवार उपलब्ध असणार आहेत.

गाडी क्रमांक (०७०५५/५६) काचीगुडा-नगरसोल-काचिगुडा ही विशेष गाडी ता.७,१४,२१आणि २८ऑगस्ट(दर गुरुवारी) दुपारी ३;४५ वाजता काचीगुडा येथून सुटेल तर नगरसोल येथून सायं ५;३० वाजण्याच्या सुमारास(दर शुक्रवारी) ता.८,१५,२२ आणी २९ रोजी सुटेल. सदरील गाडीचा मार्ग हा सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपली,शंकरपल्ली, विकाराबाद,झहीराबाद,बिदर, भालकी,उदगीर,लातूर रोड,परळी(वैजनाथ), परभणी, जालना,औरंगाबाद,रोटेगाव मार्गे असणार आहे.या विशेष गाड्यांमध्ये ३ वातानुकूलित डब्यांसह शयनयान स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page