नांदेडहुन तिरुपतीसाठी विशेष रेल्वे धावणार

Spread the love

गाडीच्या 16 फेर्‍या दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय : प्रवाशांची गर्दी

परभणी,दि.30(प्रतिनिधी)

दमरेच्या नांदेड विभागातुन तिरुपती बालाजी देवस्थाकडे धावणा-या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी मोठी गर्दी कमी करण्याकरीता नांदेड रेल्वे विभागाने नांदेड ते तिरुपती दरम्यान,विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून सदरील गाडी 16 फेर्‍यांत पुर्ण करणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे.

गाडी क्रमांक 07189 नांदेड-तिरुपती ही विशेष रेल्वे 4 जूलै ते 25 जूलै या दरम्यान धावणार असून शुक्रवारी 4 जूलै रोजी 16.30 मिनीटांनी ती नांदेडहून प्रस्थान करणार करेल, तर तिरुपतीस शनिवारी 5 जूलै रोजी 12.30 मिनीटांनी पोहचले. 07190 तिरुपती-नांदेड विशेष रेल्वे 5 ते 26 जूलै दरम्यान धावणार असून तिरुपतीहून ती शनिवारी 5 जूलै रोजी दुपारी 14.20 मिनीटांनी निघणार असून रविवारी 6 जूलै रोजी सकाळी 9.30 मिनीटांनी ती नांदेडला पोहोचणार आहे. तर 07015 या क्रमांकाची नांदेड-तिरुपती ही रेल्वे 5 ते 26 जूलै या दरम्यान धावणार असून नांदेड येथून ती शनिवारी 5 जूलै रोजी 16.50 मिनीटांनी निघणार असून रविवारी 6 जूलै रोजी 10.10 वाजता तिरुपती येथे पोहचेल. तर 07016 ही तिरुपती-नांदेड विशेष रेल्वे रविवारी 6 जूलै रोजी 16.40 वाजता तिरुपतीहुन निघेल व सोमवारी 7 जुलै रोजी 13.15 मिनीटांनी नांदेडला पोहचेल.गाडी क्रमांक 07189/07190 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाड्या प्रत्येकी आठ फेर्‍या करणार आहेत. या विशेष गाड्यांना मुखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, मेंदचल, चेलापल्ली, नरगोंडा, निर्यालागुंडा, नाडीकुडे वगैरे स्थानकावर थांबा असणार असून या विशेष गाडीमध्ये दोन एसी व तीन एसी स्लिपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे असणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाने दिली.

You cannot copy content of this page