Special Train;पुर्णा-जालना-पुर्णा साप्ताहिक विशेष २ महीने धावणार

Spread the love

पुर्णा(प्रतिनिधी)

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने सुखदायक बातमी समोर येत आहे.रेल्वे ने (पुर्णा-जालना-पुर्णा) अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार असल्याची घोषणा केली असून,ही विशेष गाडी २ महीने धावणार आहे.

उन्हाळी सुट्टी असल्याने नांदेड ते जालना दरम्यान धावणा-या दैनंदिन रेल्वे गाड्यांना गर्पूदी उसळत आहे.त्यामुळे नांदेड रेल्वे विभागाने ( पुर्णा-जालना-पुर्णा) अशी अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी चालवण्याचे जाहीर केले आहे.गाडी क्रमांक( 07057 पूर्णा- जालना) विशेष गाडी दिनांक 01 जून पासून ते 27 जुलै दरमान्य पूर्णा येथून सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि हि गाडी, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, मार्गे जालना येथे रात्री 08.50 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी जालना-पूर्णा दर गुरुवारी गाडी क्रमांक (07058 जालना-पूर्णा) विशेष गाडी दिनांक 05 जून पासून ते 31 जुलै दरमान्य जालना येथून दर गुरुवारी सकाळी 9 वाजता सुटेल आणि हि गाडी परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी मार्गे पूर्णा येथे दुपारी 12.30 वाजता पोहोचेल.

You cannot copy content of this page