सिकंद्राबाद-नगरसोल-सिकंद्राबाद साप्ताहिक विशेष रेल्वे
८ फेऱ्यांत धावणार गाडी; नांदेड रेल्वे विभागाची माहिती
पूर्णा ता.२३(प्रतिनिधी)
सिकंद्राबाद ते मनमाड लोहमार्गावर दैनंदिन धावणा-या गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने सिकंद्राबाद-नगरसोल-सिकंद्राबाद विशेष रेल्वे ८ फेऱ्यात चालवण्यात येणार असल्याचे नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.ही गाडी जुलै महिन्यात सिकंदराबाद येथुन दर गुरुवारी तर नगरसोल शुक्रवारी धावेल.
गाडी क्र.०७००१ सिकंदराबाद -नगरसोल विशेष गाडी सिकंदराबाद येथून तास.३,१०,१७आणी२४ जुलै रोजी दर गुरुवारी रात्री ९;२० वाजता सुटेल आणि लिंगमपल्ली, माल्काज्गिरी , बोलाराम, मेद्चल, कामारेद्दी, निझामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद मार्गे नगरसोल येथे शुक्रवारी सकाळी ९;४५ वाजता पोहोचेल.तर परतीच्या प्रवासात ही गाडी(०७००२) नगरसोल येथून सायं ५;३० वाजता दर शुक्रवारी ता.०४,११,१८,आणी २५ जुलै रोजी याच मार्गाने सिकंदराबाद येथे शनिवारी सकाळी ७;३० वाजता पोहोचेल.या गाडीस जनरल, स्लीपर, वातानुकूलित असे एकूण १७ डब्बे असतील.अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.