परभणी;राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चाॅकबाल संघाची निवड
ठाणे जिल्ह्यात वाशिंदा येथे होणार राज्यस्तरीय स्पर्धा
परभणी(प्रतिनिधी)
ठाणे जिल्ह्यात वाशिंदा येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय चाॅकबाल स्पर्धेसाठी परभणी चाॅकबाॅल संघाची निवड करण्यात आली असून ,संघ रवाना झाला असल्याची माहिती प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांनी दिली आहे.
१५ व्या राज्यस्तरीय चाॅकबाल स्पर्धेचे ठाणे जिल्ह्यातील वाशिंदा येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळा भात सई येथे ता.२३ ते २५ में दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्यातील खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात आली असून ,यामध्ये कर्णधार जानवी भाले,उपकर्णधार आरती भोसले, माही क-हाळे, गौरी भोसले, प्रणाली हतागळे, पुर्वी डहाळे, स्नेहल भस्के, नंदिनी देवणे, अस्मिता मुर्गे हे पात्र ठरले आहेत.संघ व्यवस्थापक अनिकेत भोसले व प्रशिक्षक पदी सुधाकर पाईकराव यांची देखील निवड करण्यात आली.निवड करण्यात आलेला संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे.अशी माहिती जिल्हा सचिव सज्जन जयस्वाल यांनी दिली.