राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ;परभणी हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंचा नेत्रदीपक विजय
खुल्या गट संघ द्वितीय तर १४ वर्षाआतील संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी
पूर्णा(प्रतिनिधी)
कोपरगांव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पूर्णा(परभणी) येथिल जिल्हा हौशी लंगडी असोशिएशन च्या खुल्या गटातील व १४ वर्षाआतील गटातींतील खेळाडुंनी मार्गदर्शक प्रशिक्षक सज्जन जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदीपक कामगिरी बजावत राज्यातुन अनुक्रमे द्वितीय तृतीय पारितोषिक पटकावले आहे.
महाराष्ट्र लंगडी असोसिएशनच्या वतीने कोपरगांव येथील मलिक इंटर नॅशनल स्कूलच्या मैदानावर दि.१८ व १९ जानेवारी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी १४ व्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत असोशिएशनचे सचिव चेतन पागावाड टेकनिकल कमेटीचे संजय गिते, मुंबई लंगडी असोशिएशनचे सचिव विवेक धावडेकर, बीडचे सचिव पाखरे सर परभणी येथील सज्जन जैस्वाल तसेच ईतर पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी नंदुरबार,मुंबई, पालघर, वर्धा, लातुर, बीड जळगांव ,बुलढाणा ,परभणी ,नाशिक ,ठाणे व कल्याण ईत्यादी जिल्हयातील संघ सहभागी झाले होते.खुल्यागटात परभणी जिल्हा हौशी लंगडी असोशिएशनच्या या मध्ये कर्णधार वैशाली धुत, यशश्री वाघ, जान्हवी भाले, हर्षदा पारटकर, गौरी भोसले,माही कराळे, स्नेहा भोरे साध्वी मोधळ, रूचा पिडगे साक्षी वाघ, गौरी डोणे शामल रोडगे या खेळाडुंच्या संघाने राज्यातुन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.तर १४ वर्षा वयोगटाआतील कर्णधार नंदिनी दवणे. उपकर्णधार अनुजा हातागळे, प्राजक्ता खरे किरण सोळके श्रेया डफुरे स्नेहल शिंदे अनुष्का खरे, शुभांगी बोबडे, अनुराधा स्वामी या खेळाडूंच्या संघाने चमकदार कामगिरी बजावत परभणी जिल्ह्याला तृतीय क्रमांक स्थान मिळवून दिले आहे.स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक सज्जन जैस्वाल,प्रकाश रवंदळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडुंच्या यशाबद्दल विद्या प्रसारणी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष विनय वाघमारे उपाध्यक्ष भिमराव कदम सचिव श्रीनिवास काबरा विजयकुमार रुद्रवार ,उत्तमराव कदम, साहेबराव कदम,कडुबा काकडे साहेब ,ज्ञानदेव रणमाळ, बी.बी मोरे डॉ. हरिभाऊ पाटील, मुख्यध्यापक डी.एल उमाटे व सर्व शिक्षक वृंद व परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या वतीने असोशिएशनचे अध्यक्ष संतोष एकलारे, उपाध्यक्ष सतिश टाकळकर, प्रकाश बनाटे ,.कैलास टेहरे, सुशिल राव देशमुख ,माणिक कदम . मोरे सर , गोविद गिराम, सतिश बरकुंटे भाकरे सर सुमित माने,जगन्नाथ कराळे ,संघव्यवस्थापक उध्दव बोबडे, संग्रामसिंग ठकुर ,सचिन डहाळे ,शिवम स्वामी या सर्वानी अभिनंदन केले..