राज्य महामार्ग क्र.६१ वर अपघाताची मालीका सुरुच
चुडावा जवळील वसमत फाट्याजवळ दुचाकी व चारचाकीचा अपघात;दोघे गंभीर जखमी
पूर्णा/प्रतिनिधी
तालुक्यातील चुडावा शिवारातील नांदेड- पूर्णा राज्य राज्य महामार्ग क्र ६१ वर अपघाताची मालीका सुरुच असुन आज शुक्रवार दि.१७ जानेवारी दुपारच्या समयी येथील वसमतफाट्यावर दुचाकी व चार चाकीचा भिषण अपघात होऊन दुचाकी वरील दोन जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
पूर्णा-नांदेड रोडवर अपघाताची मालीका सुरुच आहे.मागील आठवड्यात ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात होऊन कलमुला येथिल मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा शुक्रवारी १७ रोजी १ वाजण्याच्या सुमारास याच मार्गावर चुडावा शिवरात एका चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला असल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.चारचाकी वाहन क्रमांक एम.एच /२६ सी एच/ २०३३ मध्ये पाच जण मिळून नांदेड कडून पुर्णेच्या दिशेने येत होते तर दुचाकी क्र एम.एच /२६ सी सी/ ६५२९ वरुन दोघे चुडावा येथून वसमतच्या दिशेने निघाले होते.दरम्यान वसमत फाटा येथे रोड ओलांडून जात असताना दोन्ही वाहनांचा अपघात झाला.यावेळी चारचाकी व दुचाकी रोडच्या बाजूस असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन आपटल्या. दुचाकीस्वार
नरोजी रामजी येवले अंदाजे वय वर्षे ५५ रा मार्कंड ता.जि नांदेड व नारायण बाबुराव पुंड अंदाजे वय वर्ष ३३ रा.पिंपळगाव ता.जि.नांदेड हे दोघे घटनेत गंभीर जखमी झाले.अपघात घडताच उपस्थित जमावाने दोघांना चुडावा येथिल डॉ.सोळंके हाॅस्पिटल येथे दाखल केले डाॅक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पहाणी केली आहे.मागील काही दिवसांपासून या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.त्यातच जागोजागी दिशादर्शक फलक गती अवरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.