लॉजवर मृतावस्थेत आढळलेल्या त्या ईसमाची आत्महत्याच..!

Spread the love

हत्येच्या चर्चेला पूर्णविराम;पूर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद;अज्ञात कारणाहुंन गोळ्या खाल्ल्याचे कारण आले समोर

पूर्णा ता.१८(प्रतिनिधी)

शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या इंडियन लाॅजवर गुरुवारी ता.१७ रोजी मृतावस्थेत आढळलेल्या ४८ वार्षिय ईसमाने आत्महत्याच केल्याचे उघड झाले.असून,त्याने कोणत्यातरी अज्ञात कारणांहुन गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलीसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे.याप्रकरणी होत असलेल्या हत्या की आत्महत्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.       

पूर्णा शहरातील इंडियन लाॅजच्या १०२ क्रमांकाच्या बंद खोलीत नांदेड येथिल अनंत वासुदेवराव विष्णुपुरीकर (वय४८) यांचा गुरुवारी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती.या प्रकारानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. मयताचे जवळ एक सुसाईड नोट देखील सापडली त्यात सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची जोरदार उलट सुलट चर्चा शहरात सुरू होती.मात्र मयत विष्णुपुरीकर यांचे मामा देविदास देशपांडे( वय४९) रा.विद्यानगर नांदेड यांनी गुरुवारी रात्री उशिरा पूर्णा पोलिसांना दिलेल्या खबरीवत सदरील मयत अनंत विष्णुपुरीकर यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणांहुन गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे.यावरुन पोलीसांनी घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जरी घटने प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे प्रमुख कारण मात्र अद्यापही नक्की समजू शकले नाही.याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रकाश इंगोले हे करत आहेत.      

You cannot copy content of this page