सुहागन येथे विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Spread the love

पूर्णा,ता.१०(प्रतिनिधी);छत्रपतींच्या शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त तालुक्यातील मौजे सुहागन येथे छत्रपती संभाजी विद्यालय, व छत्रपती मोबाईल शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय (मराठवाडा) स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी  छत्रपती संभाजी विद्यालय येथे पार पडणार आहे.

     स्पर्धेत इयत्ता ७ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून प्रत्येक शाळेतून फक्त एक विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी होऊ शकणार आहे. “छत्रपती शिवाजी महाराज”, “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”, “स्वराज्य जननी जिजाऊ” आणि “शिवपुत्र संभाजी राजे” हे स्पर्धेचे प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹३ हजार ५०१ रुपयांचेव सन्मानचिन्ह ,द्वितीय क्रमांकासाठी ₹३ हजार एक,तृतीय क्रमांकाचे २ हजार ५०१ रुपयांचे तरचतुर्थ दोन हजार ,पाचव्या क्रमांकासाठी ₹१५०१  तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी  ₹१००१ ची पारितोषिक व सन्मानचिन्ह विजेत्यांना दिली जाणार आहेत. परिसरातील सर्व शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनया हिराजी भोसले, मुख्याध्यापक मनोहर कल्याणकर,गणेश बुचाले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page