पूर्णेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन;मा. नगरसेवक सुनील जाधव यांचा उपक्रम
पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळा
पुर्णा ता.४(प्रतिनिधी)
टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त पुर्णा येथे माजी नगरसेवक सुनील जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत”टायगर ग्रुप” व “एशियन व्हॅस्कुलर हॉस्पिटल, हैद्राबाद” यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.हे शिबिर रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रेल्वे इन्स्टिट्यूट, पूर्णा येथे पार पडणार आहे.
पुर्णा येथे आयोजित शिबिरात पाय व रक्तवाहिन्यांच्या विविध समस्या व आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या शिबिरात रु. ५००० पर्यंतच्या रक्तवाहिन्यांच्या तपासण्या मोफत करण्यात येणार असून, आयुष्मान भारत कार्ड व इतर सर्व विमा योजनाही मान्य असतील.
शिबिरामध्ये खालील आजारांवर तपासणी व मार्गदर्शन केले जाईल –
- पायाची सुज, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या
- नसांच्या गाठी
- पायाचे न भरून येणारे जखमा
- व्हेरिकोज वेन्स
- नसांचा त्रास, हृदयविकार
- कॅन्सर संदर्भातील समस्या
- मूत्रपिंड, मेंदू, पाठीचा कणा, सांधेदुखी आदी आजार
- डायबिटीजशी संबंधित गुंतागुंती
या शिबिरासाठी सर्व तपासण्या मोफत असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुनील जाधव व टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केले आहे.











