६ महीन्यांच्या कन्येसह विवाहीतेची विहिरीत उडी घेऊना आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील पेनुर येथिल घटना; दोघींचा जागीच मुत्यु;चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल
पूर्णा/ता.१ जुन(प्रतिनिधी)
अवघ्या ६ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन एका २८ वर्षिय विवाहीतेने शेत आखाड्यावरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील मौजे पेनुर येथे १ जुनं रोजी दुपारी घडली आहे.मुलगी सतत आजारी राहत असल्याच्या विवंचनेत सदरील महीलेने टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक दृष्ट्या उघडकीस आले असून, याप्रकरणी चुडावा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भाग्यश्री सोपानराव वानखेडे,(वय२८)वर्ष तसेच सान्वी सोपानराव वानखेडे, (वय ६) महिने, दोघी रा.पेनूर, ता.पुर्णा,जि.परभणी.असं मयत मायलेकीचे नांव आहे.हाती आलेल्या माहितीनुसार, सदरील विवाहीता हीस सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले होते. मात्र जन्मापासून मुलगी सान्वी ही सतत आजारी राहत असल्याने भाग्यश्री ही चिंतेत होती.सतत विचारात राहून शेवटी मयत भाग्यश्रीने सहा महिन्यांच्या चिमुकल्या सान्वी सह १ जुनं रोजी दुपारी गावापासून जवळ असलेल्या आपला चुलता यशवंत आणाराव वाके यांच्या शेतातील विहीरीत उडी घेतली.दरम्यान हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांना लक्षात येताच तातडीने भाग्यश्रीला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला तीस कावलगांव येथिल प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु घटनेत दोघींचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.घटनेची माहिती भाग्यश्रीचे काका यशवंत वाके यांनी चुडावा पोलिसांना दिली.घटनास्थळी फौजदार अरुण मुखेडकर,पोहेकाॅ.कच्छवे यांनी धाव घेऊन मृत्यूदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून दोघींचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.चुडावा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास फौजदार मुखेडकर करत आहेत.