श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सामूहिक सेवा व भव्य मांदियाळी

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

येथिल अमृतनगरभागातील श्री स्वामी समर्थ बाल अध्यात्मीक सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जयंतीनिमित्त (प्रगटदिन) सामुहिक सेवा व भव्य मांदियाळीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राच्या सेवेक-यांनी दिली आहे. पूर्णा नगरीतील सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी भाविक दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्ती भावाने साजरा करतात.याहीवर्षी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात जयंती उत्सवानिमित्त मांदियाळीचे आयोजन सोमवार ३१ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता महाआरतीनंतर करण्यात आले आहे, तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ अवश्य घ्यावा. असे आवाहन केंद्रातील सेवेक-यांनी केले आहे.

You cannot copy content of this page