वंदेभारत रेल्वेला थांबा न दिल्यास पूर्णेत ‘रेलरोको’

Spread the love

स्वराज्य शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष मेहमूद तांबोळी यांचा रेल्वे प्रशासनाला गर्भित ईशारा

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)

ता.२८ रोजी नांदेड येथुन सुटणाऱ्या नांदेड- मुंबई ‘वंदेभारत’ एक्सप्रेसला पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावर थांबा न दिल्यास पुर्णा रेल्वे स्थानकांवर रेलरोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा स्वराज्य शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष मेहमूद तांबोळी यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांना शनिवारी निवेदन देखील दिले आहे.

रेल्वे बोर्डाने बहुचर्चित जालना-मुंबई वंदेभारत एक्सप्रेसचा नांदेड स्थानकापर्यंत विस्तार केला आहे.२६ रोजी अनौपचारिक उद्घाटन करण्यात येणार असुन उद्घाटन विशेष रेल्वे धावणार आहे.तर ता. २८ जुलै पासून नांदेड ते मुंबई अशी नियमित पणे ही गाडी चालवण्यात येणार आहे. पुर्णा हे रेल्वेचे माहेरघर असुन मोठे जंक्शन आहे. येथुन औरंगाबाद,नाशिक, मुंबई येथे व्यापारी प्रवास करतात अति महत्वाचे व्यक्ती दैनदिन प्रवास करतात मात्र या गाडीला पूर्णेत थांबा देण्यात आला नाही.ही गाडी पुर्णा रेल्वे स्थानकावर २८ रोजी न थांबल्यास स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष महेमुद तांबोळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह ‘रेलरोको’ आंदोलन करणार आहेत. उद्धभवणा-या परिस्थीतीला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असे म्हटले आहे.तसे निवेदनही त्यांनी स्वाक्षरीनिशी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना दिले आहे..

You cannot copy content of this page