कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात;पुर्णेतील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Spread the love

मयत सामाजिक कार्यकर्ते सय्यद अली यांचे सुपुत्र; परभणी-वसमत रस्त्यावरील धानोरा(भो) पाटीजवळील घटना;शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना

पूर्णा(प्रतिनिधी)

परभणी वसमत रस्त्यावरील धानोरा भोगाव पाटी जवळ शनिवार ता.१५ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार व ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. अपघातात पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सय्यद अली हसन यांच्या २४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
      सय्यद खाजा सय्यद अली रा.इकबाल नगर पूर्णा (वय २४) वर्षे असत्या मयत तरुणाचे नाव आहे.सदरील मयत तरुण हे पूर्णा येथून शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.पहाटेची नमाज पठण करून खाजा हे वसमत,झिरोफाटा रस्त्याने आपल्या स्विफ्ट कार क्र.(एम.एच.१४/एफ.सी./२२७५) ने पुर्णेकडे येत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला.त्यांची चारचाकी आरळ ते हयातनगर फाटा दरम्यानच्या धानोरा(भो) पाटीजवळ आली असता.रस्त्यावर उभ्या असलेल्या (एम.एच. २२/६४२७)क्रमांकाच्या ऊसाच्या ट्रॅक्टरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली.त्यावेळी परिसरात जोरदार आवाज झाला.यावेळी आवाजाने परिसरातील शेतकरी तसेच रस्त्यावरील वाहनधारकांनी गर्दी केली होती.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,पहाटे दिवस उजडण्यापूर्वी असलेल्या काळोखात समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर उजेडामुळे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारची रिफ्लेक्टर नसल्याने त्यांना रस्त्यावर उभ्या असलेल्या अंदाज आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले.परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना व स्थानिक पोलीसांना अपघाताची माहिती देत त्यांच्यावर उपचार करण्याहेतुने त्यांना जवळील रुग्णालयात हलविले परंतु अपघातात गंभीर जखमी झालेल्या खाजा यांचा मृत्यू झाला होता.
   सय्यद खाजा हे पूर्णेतील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष,आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे निकटवर्तीय सय्यद अली हसन सुपुत्र आहेत.मागील ३ते ४ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह संपन्न झाला होता. शनिवारी सकाळी घटनेची खबर पुर्णा शहरात धडकताच परिसरात मित्र वर्गात हळहळ व्यक्त होत होती.मयत खाजा यांच्या वर शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पूर्णा मुस्लिम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. त्यांच्या पश्चात आई,वडील सय्यद अली,चुलते सय्यद रसुल व सय्यद हबीब,४ भाऊ, १ बहीण काकु भावजी असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page