ताडकळस-पालम रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात
धानोरा काळे शिवारातील बानेगांव पाटीजवळील घटना; दोघं गंभीर जखमी
पूर्णा(प्रतिनिधी) तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या धानोरा काळे गाव शिवारातून पालम कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी ता. ३ मार्च रोजी दोन वाहनांचा भिषण अपघात झाला.या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जखमींवर ् परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
अभिजीत राठोड व राहुल पवार अशी जखमींची नांव असल्याचे माहीती आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी सकाळी ताडकळस -धानोरा काळे रस्त्यांवरील बानेगाव पाटीजवळ थार कंपनीच्या एम. एच. २६ सीई ११६२ व डिजायर क्रमांक एम.एच. २२ ए.एम. ९६३२ या दोन वाहनांचा अपघात झाला. अपघात होताच ताडकळस -पालम रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी व आजुबाजूच्या परिसरातील
शेतकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच धानोरा काळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ बोलाऊन. या अपघातात जखमी अभिजीत राठोड व राहुल पवार या दोघांना ताडकळस येथे प्रार्थमिक उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.