अवैध वाळू उपसा;पूर्णा नदीपात्रातील चार तराफे केले नष्ट

Spread the love

ताडकळस पोलिसांची कारवाई

ताडकळस/प्रतिनिधी:
ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी देशमुख शिवारात नवागड जवळ अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे पूर्ण नदीपात्रातील तर्फे पोलिसांनी नष्ट केल्याचे घटना रविवार दि 4 रोजी घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचे राजरोसपणे उपसा होत असल्याबद्दलची माहिती ताकद पोलिसांना मिळाले. यावरून ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे निरीक्षक श्रीकांत नागरगोजे रामकिसन काळे अतुल तेहरे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीचे साहित्य चार तराफे नष्ट केले.

परभणी जिल्हा पोलीस जिल्हाभरातील अवैध व्यावसायिक, अवैध वाळू उपसा आदी प्रकरणांवर धडक कारवाई करीत आहे. जेणेकरून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांततेचे वातावरण कायम राहील.

                        _____________________

You cannot copy content of this page