व्हाईस आँफ मिडियाच्या ताडकळस शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सुरेश मगरे
उपाध्यक्षपदी फेरोज पठाण,सरचिटणीस नजीर पठाण, कार्याध्यक्ष धुराजी होनमणेंची सर्वानुमते निवड
ताडकळस(प्रतिनिधी):
तालुक्यातील ताडकळस येथील व्हाईस आँफ मिडिया संघटनेची नुतन कार्यकारणी मंगळवार १८ मार्च रोजी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुरेश सोपानराव मगरे तर उपाध्यक्षपदी फेरोज पठाण, सरचिटणीस नजीर पठाण, कार्याध्यक्ष धुराजी होनमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ताडकळस येथे मंगळवार १८ मार्च रोजी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुरज कदम,जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, पूर्णा तालुकाध्यक्ष आनंद ढोणे, तालुका उपाध्यक्ष गजानन नाईकवाडे, जेष्ठ पत्रकार विनायक देसाई, शिवाजी बोबडे आदींच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली.या बैठकीत पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सुरेश सोपानराव मगरे ,उपाध्यक्ष फेरोज पठाण,सरचिटणीस नजीर पठाण ,कार्याध्यक्ष धुराजी होनमणे,कोषाध्यक्ष संतोष कांबळे,सहकोषाध्यक्ष वजीर पठाण ,सहसरचिटणीस दिलीप पवार,कार्यवाहक प्रल्हाद शिराळे,सहकार्यवाहक सचिन शिंदे, प्रवक्ता अनिकेत रूद्रवार,संघटक गंगाप्रसाद गुंजकर,सहसंघटक गोपीराज जावळे,प्रसिद्धी प्रमुख दिपक कानडे, मार्गदर्शक शिवहार स्वामी, विद्यासागर साळवे , शफोटोग्राफर करीम पठाण,
सदस्य नामदेव कनकटे,प्रताप काळे, मुंजाजी पडोळे,रवि कनकटे, शिवाजी काळे, सय्यद रफिक, प्रशांत शिंदे आदींची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे शाल, श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सुत्रसंचलन गजानन नाईकवाडे तर आभार गंगाप्रसाद गुंजकर यांनी व्यक्त केले.