पूर्णेत मंगळवारी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन-उत्तमभैय्या खंदारे यांची माहिती

Spread the love

प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो व पँथर राहूल प्रधान यांची उपस्थिती

पूर्णा /प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे यंदाही येथिल तथागत मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या सोहळ्याचे आयोजन दि.१४ जानेवारी रोजी करण्यात आले असून प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो व पँथर राहूल प्रधान यांची उपस्थिती राहणार आहे तर यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचापुरस्कार देऊन गौरवीण्यात येणार असल्याची माहिती तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांनी दिली आहे.
पूर्णा येथील डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो ,भन्ते पंयावंश कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रिपाइनेते प्रकाश कांबळे प्रमुख वक्ते म्हणून पँथर. राहूल प्रधान इंजि. विवेकमवाडे नांदेड सत्कारमूर्ती म्हणून प्रेमनाथ सुर्यवंशी, अशिष वाकोडे परभणी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, दिलीप हनूमंते हाजी कुरेशी, जाकीर कुरेशी ,प्राचार्य मोहन मोरे, संतोष एकलारे ,यादवराव भवरे ,नामदेवराव राज भोज ,पोलीस निरीक्षक विलास गोबाडे ,रवि सोनकांबळे ,राजकुमार एंगडे, राजु खरात, गौतम मौगले, स्वागताध्यक्ष म्हणून दादाराव पंडित प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदमनगरसेवक अनिल खगर्रखराटे, देवराव खंदारे, ॲड धम्मा जोंधळे ,मधूकर गायकवाड , ॲड हर्षवर्धन गायकवाड, विरेश कसबे,अशोक धबाले महेबूब कुरेशी, दिलीप गायकवाड, शामराव जोगदंड श्रीकांत हिवाळे, एमयु खंदारे, नगरसेविका गयाबाई खंदारे बीबी वाघमारे ,बौद्धाचार्य तुकाराम ढगे ,त्र्यंबक कांबळे अमृत कऱ्हाळे ,अतूल गवळी ,उमेश बाऱ्हाटे आदीं उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ११ वा शाहीर प्रकाश जोंधळे यांच्या भिमव बुद्ध गीतांच्या प्रबोधन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास जास्तीत संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष तथा संयोजक उत्तम खंदारे व तथागत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

You cannot copy content of this page