भारतीय जवानांच्या सन्मानार्थ निघाली तिरंगा बाईक रॅली
पूर्णा ( प्रतिनिधी)
भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर मधील केलेल्या शौर्याच्या सन्मानार्थ पूर्णा शहरात बुधवारी २१ रोजी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली.
देशभरात तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी तिरंगा रॅलीचे ठिक ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.पुर्णा शहरातही बुधवारी लक्ष्मीकांत ( बाळू )कदम गोविंद राज ठाकर यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.आयोजित केलेल्या तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी सैनिक यांच्या हस्ते पुष्पहार करून करण्यात आली यावेळी मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रसंगी माजी सैनिक गणेश भाऊ कदम, मन्नुसिंह ठाकूर ,शंका डहाळे ,सोमनाथ काकडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी लक्ष्मीकांत (बाळू )कदम ,प्रशांत कापसे, डॉक्टर अजय ठाकूर ,नितीन कदम, हरिभाऊ कदम, ,राजेश भालेराव, दयाल ओझा, एकनाथ काळबांडे काका, विष्णू कमलू प्रताप कदम,अनंत पारवे, ईश्वर परडे, ,बळीरामजी कदम, गोविंद राज ठाकर सह पूर्णा शहरातील देशभक्त नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते