शेत व पांदण रस्ते प्रकरणांचा निवाड्यांसाठी ‘सस्ती अदालत’ उपक्रमाचा लाभ घ्यावा-निवासी जिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी

Spread the love

पूर्णेत ‘सस्ती अदालत’उपक्रमांतर्गत १२ प्रकरणांचा न्याय निवाडा

पूर्णा/ प्रतिनिधी

   शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून गाव, वाड्या, वस्त्या वरील शेत शिवारातून जाणाऱे शेत रस्ते व पांदण रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी सरसावले आहे.त्यासाठी तालुकानिहाय तहसील कार्यालयामध्ये महीन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात येत असून या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपली प्रकरणं निकाली काढून घ्यावेत असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.      

 पूर्णा तहसील कार्यालयात शुक्रवारी ९ मे रोजी शेत रस्ते व पांदण रस्ते मुक्त करण्यासाठी येथील महसूल विभागामार्फत उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली  शुक्रवारी ९ में रोजी ‘सस्ती अदालतीचे’ आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित कार्यक्रमास निवासी जिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांची विशेष उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होत्या प्रसंगी तहसीलदार माधवराव बोथिकरकर यांनी कार्यक्रमाची भुमिका विषद केली. दरम्यान ताडकळस, पूर्णा, कावलगांव या महसूल मंडळातील गावांतील अनेक दिवसांपासून वादग्रस्त प्रलंबित असलेले शेत रस्ते व पांदण रस्ते मुक्त करण्यासाठीचे एकूण ३३ प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. यापैकी तडजोडी आणती एकूण १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. असल्याचे तहसीलदार बोथिकर यांनी सांगितले. ताडकळस मंडळासाठी नायब तहसीलदार प्रशांत थारकर,कावलगांव विभाग ना.त  कृष्णाजी मस्के तर पूर्णा मंडळा अंतर्गत व्यंकटेश जजरवार यांनी काम पाहिले. प्रसंगी मंडळ अधिकारी के.पी.शिंदे,रमेश घोडके,श्रीमती शेलगांवकर, तलाठी गणेश गोरे, तलाठी गोडबोले प्रियंका जोंधळे,उज्वला पुलेवार, श्रीमती उबाळे आदींनी काम पाहिले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी देशमुख, साईनाथ द्याडे,शिवा देवणे,नंदकुमार शेलाटे सह आदींनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page