परभणी;शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकरी संवाद दौरा!

Spread the love

जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रविंद्र धर्मे यांची माहिती ;परभणी,मानवत,पाथरी तालुक्यात शेतकऱ्यांना भेटणार;कर्जमाफी जाहीर करा,शिवसेनेची मागणी

परभणी, ता.६ (प्रतिनिधी)राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दोन दिवसीय शेतकरी संवाद दौऱ्यावर आजपासून (दि.७) परभणी जिल्ह्यात दाखल होत आहेत.

राज्य सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज “फसवे” असल्याचा आरोप करताना शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असून सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला किमान १८ हजार रुपयांचे अनुदान देणे आवश्यक आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.आनेराव यांनी गुरुवारी (दि.६) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले उपस्थित होते.या दौऱ्यात उद्धव ठाकरे परभणी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे – 👉 आज शुक्रवार (दि.७) दुपारी ४ वाजता परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेतकरी संवाद बैठक होईल. 👉 शनिवारी (दि.८) सकाळी १० वाजता मानवत तालुक्यातील ताडबोरगाव (जिंतूर-सेलू विधानसभा) आणि ११ वाजता पाथरी मतदारसंघातील ढेंगळी पिंपळगाव येथे शेतकऱ्यांशी ठाकरे संवाद साधतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजवर ते पूर्ण झालेले नाही, असा आरोप आनेराव यांनी केला. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी आंदोलनानंतरच सरकारला रब्बी हंगामासाठी १० हजार रुपयांचा निधी जाहीर करावा लागला, हेच त्यांच्या लढ्याचे यश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page