पूर्णा, ता.२०(प्रतिनिधी) :
शिवसेना व स्वातंत्र्य सैनिक (कै.) दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त 'पंचमी महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक मिनाताई विजयकुमार कदम यांनी दिली.
पूर्णा शहर व पूर्णा परिसरातील सर्व महीलांसाठी नागपंचमी निमित्त पंचमी महोत्सवाचा कार्यक्रम मंगळवारी (ता. २९) आयोजित करण्यात आला आहे. केवळ महिलां व मुलींसाठीच हा कार्यक्रम आहे. सुमन मंगल कार्यालयात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान महोत्सव होणार आहे. यावेळी खरोखरच्या नामदेवतेची पुजा करण्याची संधी यावेळी महिलांना मिळणार आहे . तसेच महिलांचे विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी सर्व महिलांना छत्री भेट देण्यात येणार आहे. अल्पोपाहाराची सोय करण्यात आली आहे. यावेळी झोके, आकाशपाळणा, चक्री, जंपींग आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त महीलांनी पंचमी महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मिनाताई कदम यांनी केले आहे.