ट्रॅक्टर मालकाची चालकाला विटकरीने जबर मारहाण

Spread the love

ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी;अपघात झालेल्या ट्रॅक्टरची नुकसान भरपाई न दिल्याने झाला वाद;चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पूर्णा ता.२४ (प्रतिनिधी). सहा महीन्यांपुर्वी झालेल्या अपघातात  ट्रॅक्टरच्या नुकसान भरपाईची मागणी करत ट्रॅक्टर मालकाने चालकाला विटेने बेदम मारहाण केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव येथे घडली असून,याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव येथिल रामेश्वर उर्फ बाळू पिसाळ यांच्या कडे असलेल्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर गावातील २७ वर्षीय तरुण मुंजाजी रामदास कंठे हा चालक म्हणून काम करत असे.दरम्यान सहा महिन्यांपूर्वी तो नृसिंह कारखाना येथे ऊस खाली करून कावलगांवकडे परत येत असताना लोहगाव जवळ ट्रॅक्टर उलटला होता.त्यात वाहनांचे नुकसान देखील झाले होते. यानंतर झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी मालक बाळू पिसाळ हे जाच करत होते..याविषयावर यापुर्वीही दोघांत वाद विवाद होऊन मुंजाजीयास मारहाण देखील झाली होती.सोमवारी ता.२३ जुन रोजी ट्रॅक्टर मालकाने मुंजाजीला फोन लाऊन कावलगांव बस स्थानकाजवळ बोलावत पैशाची मागणी केली.मुंजाजीने कशाची भरपाई द्यायची असे म्हणताच बाळु पिसाळ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.दरम्यान त्याच्या सोबत असलेल्या अंबादास पिसाळ याने रस्त्यावरील एक विटकर उचलून मुंजाजीवर हल्ला चढवला.यात त्याने मुंजाजीला तोंडावर मानेवर विटेने जबर मारहाण केली.यात मुंजाजी पुरता जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी मुंजाजी  कुठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक बाळू पिसाळ, अंबादास पिसाळ या दोघांविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुरनं१४६/२०२५ भान्यासं कलम ११८(१),११५,३५२,३५१(३),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,घटनेचा तपास जमादार कच्छवे हे करत आहेत

You cannot copy content of this page