तपोवन एक्स्प्रेसच्या धडकेत २५ वर्षी तरुण जागीच ठार
पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील पांढरी रुपला शिवारातील घटना;चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)
तालूक्यातील चुडावा ते वसमत रस्त्यावर असलेल्या भुरारी पुलाजवळील पांढरी शिवारातील पूर्णा-नांदेड रेल्वे लोहमार्ग पटरीवर धावत्या तपोवन एक्सप्रेसच्या धडकेत एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना
सोमवार ता.३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून, घटनास्थळावरून चुडावा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे..
या बाबत अधिक माहिती असी की, सोमवारी ३ रोजी सायं ५ ते साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून नांदेडकडे भरधाव वेगाने निघालेली( तपोवन एक्स्प्रेस)ने चुडावा रेल्वे स्टेशनपार केल्यानंतर पांढरी शिवारातील चुडावा-वसमत रस्त्यावर असलेल्या भुयारी मार्ग पुलाच्या परिसरातील लोहमार्गावरून जात असलेल्या अंगात पांढरा शर्ट आणि पायात निळी जिन्सची पॅन्ट घातलेली असून रंग गोरा, सरळ नाक, केस काळे असलेल्या जेमतेम २५ वर्ष वयाच्या अनोळखी तरुणास तपोवन एक्सप्रेसने जोरदार धडक दिली.यात त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले.घटनेत मयत झालेला तरुण नेमका कुठला आहे.त्यास रेल्वेची धडक नेमकी कसी काय बसली यांचा उलगडा मात्र होऊ शकला नाही.
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी चुडावा पोलीसांना देताच पोलिस ठाण्याचे ठाणेदार, जमादार कच्छवे आदींनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.याप्रकरणी चुडावा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असल्याचे समजते.
सदरील वर्णनाचा तरुण जर कोणाच्या ओळखीचा असेल तर चुडावा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन ठाणेदार नरसिंह पोमनाळकर यांनी केले आहे.