‘राज्यराणी एक्स्प्रेसच्या’ धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील घटना;पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)’
राज्यराणी एक्स्प्रेसच्या’धडकेत एका अनोळखी ३० वर्षीय ईसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या पूर्णा-नांदेड लोहमार्गावर ता.१०एप्रिल गुरुवारी सकाळच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी पूर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील पूर्णा ते चुडावा दरम्यान येथून नांदेडकडे निघालेल्या भरधाव ‘राज्यराणी एक्स्प्रेस’ खाली मैल अंतर क्र.३२१/१ ते ३२१/३ च्या दरम्यान एका ईसमास रेल्वेच्या धडकेत डोक्यात जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू पावला असल्याची खबर रेल्वे चालकाने चुडावा स्टेशन मास्तर यांना दिली.पुर्णा हद्दीतील घटना असल्याने रेल्वे विभागाने पूर्णा पोलीसांना या बाबतीत कळवले.घटनेची माहिती मिळताच पो.नि.विलास गोबाडे,सपोऊपनि.अण्णा माने,पो.शि.बंडु राठोड,पो.शि.सुधिर काळे,चापोशि.केशव मुंढे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यूदेह ताब्यात घेत पंचनामा केला.यावेळी सदरील ईसम नेमका कोण आहे.त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची ओळख निष्पन्न होऊ शकली नाही. सदरील ईसम अंदाजे ३० वर्ष वयाचा असुन,त्यांचे डोक्यावर अर्धवट टक्कल पडलेले,अंगात काळा सदरा पांढरा जिन्स,सावळा रंग असे वर्णन आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.