नांदेड-छ. संभाजीनगर,परभणी-नांदेड,एक्सप्रेस गाड्या रद्द
पूर्णा( प्रतिनिधी)
नांदेड रेल्वे यार्ड परिसरात सुरू असलेल्या पीटलाइन दोनच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी ते नांदेड या दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्या येत्या काही दिवसांसाठी ३ मार्च रोजी पर्यंत रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे.या दोन्ही गाड्या सोमवार ता.१७ फेब्रुवारी पासून रद्द करण्यात आल्या आहेत.
नांदेड येथे पिट लाइन क्रमांक-२ च्या विस्तारीकरणाचे कार्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.सदर कामासाठी आज ता.१७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून दैनंदिन चालवण्कायात येणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी क्र. ५७६५९ परभणी-नांदेड एक्स्प्रेस ही गाडी १८, २०, २२, २३, २६, २७ फेब्रुवारी आणि १ व २ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. १७६२० नांदेड-छ.संभाजीनगर एक्स्प्रेस ही गाडी २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली. पीट लाइनच्या कामकाजामुळे रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम होत असून काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे