भरधाव ट्रकची एसटीला धडक;६ प्रवासी जखमी
सुदैवाने मोठा अनर्थ टळला;वारंवार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाट्यावर पुसद कंधार बसला एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी २० में रोजी सकाळच्या सुमारास घडली असून, अपघातात बसमधील ६ जणं जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.वारंगा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्षतीग्रस्त वाहने ताब्यात घेत नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी कंधार डेपोची बस क्र.(एम. एच-२० /बी एल /१७३८) ही पुसद येथून वारंगा फाटा, नांदेड मार्गे कंधार कडे निघाली होती.वारंगा फाटा येथे सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वारंगा बस स्थानकातुन नांदेडच्या दिशेने जात असतानाच नांदेड कडून भरधाव वेगाने येणार्या ट्रक क्रमांक (आर.जे-१७ /जीए/ ६०६५) ने प्रवासी बसला मधोमध धडक दिली. यात बसमधील सहा प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ह्यात बसचे मोठं नुकसान झाले आहे.अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.वारंगा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहन ताब्यात घेतली आहे.या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून,तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वारंगा फाटा बीट चे जमादार शेख बाबर पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर भोंग हे करीत आहेत.