नव्या मोंढ्यात विद्युत खांबाला ट्रक धडकला

Spread the love

पुर्णेतील घटना; महावितरणचे हजारोंचे नुकसान

पूर्णा ता.११(प्रतिनिधी)

ट्रकच्या धडकेत विद्युत उखडल्याची घटना पुर्णा शहरातील नवा मोंढात सोमवारी ता.११ रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेत महावितरणचे हजारों रुपयांचे नुकसान झाले असून, (Purna Mahavitaran News)महावितरणकडून संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो की नाही याकडे लक्ष लागले आहे.

Oplus_16908290

      पूर्णा शहरातील नवा मोंढा भागात सोमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास एक खत बी-बीयाणे घेऊन के.ए.२२/डी/७६६९ क्रमांकाचा १० चाकी ट्रक एका दुकानावर आला होता.दरम्यान मोंढा बाजारात असलेल्या ५ नंबरच्या गाळ्या समोर प्रांगणात असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या एका खांबाला जोरदार धडक दिली.धडकेत हा खांब जमीनीपासुन तुटला.सध्या खरिपहंगामाने सिझन आहे.मोढ्यांत ब-यापैकी शेतकऱ्यांची वर्दळ होती.परंतु यापैकी सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र महावितरण कंपनीचे या घटनेत सुमारे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.खांबाला ट्रक धडकताच मोंढा बाजारात विद्युत तारेत स्पार्कींग होऊन जाळ निघाला. यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी सदरील माहिती महावितरण कंपनीला देताच घटनास्थळी महावितरण कंपनीचे शहराभियंता वसमतकर लाईनमेन चिमटे, लाईनमेन लटपटे,लाईनमेन नवघडे आदींनी धाव घेऊन पाहाणी करत विद्युत पुरवठा खंडित केला.यानंतर सदरील ट्रकला जमीनीपासुन खांब तुटून  तो ट्रकला अटकलेला अवस्थेत आहे.याबाबत विचारणा केली आहे.वृत्त लिही पर्यंत मागील दोन ते तीन तासांपासून परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.या प्रकरणी महावितरण कंपनीच्या वतीने सदरील ट्रक चालकास दंड आकारुन सोडण्यात येते की त्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page