पूर्णेत रविवारी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीजचे आयोजन-हभप.सोपानकाका बोबडे
लक्ष्मणशक्ती, भव्य किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा -ह.भ.प.सोपानकाका बोबडे(माटेगांवकर)
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल झिरोफाटा रोडवरील श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात येथिल वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवारी ता.१६ रोजी
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीजचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने लक्ष्मणशक्ती, ह.भ.प.अच्युत महाराज दसतापुरकर यांचे भव्य किर्तन सोहळा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सुप्रसिद्ध संगीत अलंकार ह.भ.प. सोपानकाका बोबडे माटेगांवकर यांनी केले आहे.
पूर्णा शहरात मागील काही वर्षांपासून येथिल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम महाराज बीजचे आयोजन करण्यात येते यानिमित्ताने शनिवारी १५ रोजी लक्ष्मण शक्ती तसेच रविवारी सकाळी १० वाजता महाराष्ट्र भुषण ह.भ.प.अच्युत महाराज दसतापुरकर यांचे भव्य किर्तन त्या नंतर बीज निमीत्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून,या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहान श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. सोपानकाका बोबडे यांनी केले आहे.