तहसील प्रवेशद्वारालगतची २ दुकाने पेटली
पुर्णेतील घटना;आगीत लाखोंचे नुकसान
पुर्णा,ता.८(प्रतिनिधी);येथिल तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत असलेली २ दुकाने अचानक लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाली असून, दुकानातील आँनलाईन साठीचे झेरॉक्स मशीन, कॅम्युटर, लपटाप, प्रिंटर टेबल खुर्च्या, पंखे, कपाट आदीं लाखों रुपयांचे साहित्याचे पुरते नुकसान झाले आहे.
पुर्णा-ताडकळस रस्त्यावर असलेल्या ऐन तहसील कार्यालयाच्या गेटवर हाँटेल, झेरॉक्स, आँनलाईन सेवा केंद्र तसेच विधीज्ञांचे कार्यालय आहेत.यातील ऐन गेटजवळ अँड.राजेश भालेराव व अँड.पळसकर यांचे कार्यालय होते. कार्यालयाला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.पहाता पहाता आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्या साठी आटोकाट प्रयत्न केला.शेवटी पालीकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना प्राचारण करण्यात आले.अग्नीशामन दलाच्या जवानांनी सदरील आग आटोक्यात आणली.आगीत दोन दुकाना तील लाखों रुपयांचे साहीत्य जळून नष्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मात्र सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समजते.











