दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मूत्यु

Spread the love

ताडकळस-सिंगणापुर रस्त्यावरील माखणी पाटीजवळील घटना;ताडकळस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

पूर्णा ता.१२(प्रतिनिधी)

शेतातून आपली दुचाकी घेऊन गावाकडे परतत असलेल्या एका (३५) वर्षीय युवकाच्या दुचाकीला भीषण अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील माखणी पाटीजवळ ता.११ रोज शुक्रवारी रात्री ९;३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ताडकळस पोलीस स्थानकांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सुखानंद मोहन सलगर (वय ३५) वर्ष राहणार फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी सध्या मयत तरुणाचे नांव आहे. सुखानंद हा सायंकाळच्या सुमारास इथून जवळच असलेल्या आपल्या शेतात गेला होता. शेतातील कामे आटोपून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आपली दुचाकी क्र. एम.एच /२२/ ए.बी/ ६३९७ घेऊन गावाकडे परतत असताना त्यांच्या दुसाकीला ताडकळस सिंगणापूर रस्त्यावरील माखणी पाटीजवळ अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात त्याच्या डोक्याचा अक्षरशा भुगा झाल्याचे दिसून आले घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पहावयास मिळाला. मात्र सदरील अपघात हा नेमका कशामुळे व कसा झाला याबाबतीत कोणतीही खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.परिसरातील काही नागरिकांनी घटनेची माहिती ताडकळस पोलिसांना दिली.ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शव विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकळस येथे दाखल केला. दरम्यान मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह मयताचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी ताडकळस पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page