अल्पवयीन युवतीला फुसलाऊन पळवले

Spread the love

पूर्णा शहरातील घटना;अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल हरिनगर परिसरात राहणाऱ्या मोलमजुर कुटुंबातील एका साडे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणांहुन फुसलाऊन पळवून नेल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात शनिवारी २६ रोजी पिडीत मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्यानुसार विविध कलमाखाली अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह येथिल हरिनगर परिसरात राहते ता.२२ रोजी मध्यरात्री ती घरात झोपलेली असताना तीला अज्ञात इसमाने तीच्या अजानतेपणाचा फायदा घेऊन तीला कशाचे तरी अमीष दाखवून तीला फुसलाऊन पळवून नेले आहे.मुलगी घरात आढळून न आल्याने तीच्या कुटुंबीयांनी तीचा सर्वत्र शोध घेतला ती कोढेही आढळून न आल्याने शेवटी तीच्या वडीलांनी ता.२६ एप्रिल रोजी शनिवारी पूर्णा पोलीस ठाणे गाठून पोलीसांना सर्व हकीकत सांगितली.पोलीसांनी याप्रकरणी पिडीत मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा तपास पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि श्रीमती शहारे ह्या करत आहेत.सदरील मुलगी ही साडेसतरा वर्षे वयाची असुन,१२ वीत शिक्षण घेत आहे., रंग-गोरा, बांधा-मध्यम, उंची- साडे पाच फुट, पोषाख-अंगात काळ्या पांढ-या रंगाचे टी शर्ट व काळया रंगाची नाइट पॅन्ट पायात – पांढ-या रंगाचे बुट भाषा मराठी, हिंदी, तेलगु बोलते अश्या वर्णनाची मुलगी कोणास आढळून आल्यास पूर्णा पोलीसांनी संपर्क साधावा असे आवाहन . पो.नि.विलास गोबाडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page