अल्पवयीन मुलीला फुसलाऊन पळवले.!

Spread the love

देगांव(ते) येथील घटना;पूर्णा पोलीसांत अपहरणाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)
एका १७ वर्षं १० महीने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ता.१५ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील देगांव(ते) येथे घडल्याचे उघडकीस आले असून,या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पूर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीत एका ४२ वर्षीय शेतकऱी कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलांसोबत देगांव येथे राहते.गावातील प्रसाद क्षिरसागर नामक तरुण मागील काही महिन्यांपासून त्या मुलीला त्रास देत असल्यामुळे तीच्या पालकाने पूर्णा पोलिस ठाण्यात आॅगस्ट महीन्यात तक्रार दाखल करत गुन्हा ही नोंद केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे.दरम्यान शुक्रवारी ता.१४ रोजी रात्री सदरील मुलगी व तीचे आई वडील घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुलीचे वडील लघुशंकेसाठी जागे झाले असता त्यांना घरात आपली मुलगी दिसली नसल्याने त्यांनी आपल्या पत्नीला झोपेतून जागे केले.दोघांनी मुलीला शेजारी पाजारी,सर्वत्र शोधले परंतु मुलगी कोठेही आढळून आली नाही.हा प्रकार पिडीत मुलीच्या वडिलांनी पूर्णा पोलीसांना कळवला.पूर्णा पोलिस ठाण्यात शनिवारी ता.१५ रोजी रात्री उशिरा सदर मुलीच्या पित्याने देगांव येथिल प्रसाद क्षिरसागर यानेच त्यांच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी प्रसाद क्षिरसागर याचे विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास पो.नि.विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.श्रीमती शहारे ह्या करत आहेत.

You cannot copy content of this page