चुडावा पोलीस हद्दीत अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडले..!

Spread the love

संशयास्पद स्थितीत आढळलेल्या मृतदेहामुळे खळबळ; उलटसुलट चर्चेला उधाण; गुन्हा दाखल

पूर्णा/चुडावा ता.२०(प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील चुडावा पोलीस हद्दीतील कावलगांव शिवारात एका ५५ वर्षीय ईसमाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.शेतात चिखलात फसलेले, मुंग्या लागलेले व गंभीर अवस्थेतले अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडल्याने परिसरात खळबळ एकच खळबळ उडाली असून, उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.याप्रकरणी चुडावा पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चुडावा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावलगांव येथिल भाजपचे कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य नारायण मारोतराव पिसाळ यांची शेती आहे.शेतात अद्रकीचा प्लाॅट लावलेला आहे.शुक्रवारी(ता.१९)सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या शेत मजुरांना अद्रकाच्या शेतात हे प्रेत दिसून आले. मयताच्या शरीरावर धोतर व कमीज असल्याचे सांगितले जात असून, डावा हात ताटलेला, उजवा हात दिसून न येणारा, पाय दुमडलेल्या अवस्थेत व पायात काळे बूट असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. पूर्ण शरीरावर मुंग्या लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.घटनेची माहीती चुडावा पोलीसांना दिली घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला आहे.याप्रकरणी पोलीस पाटील अविनाश सदाशिव वंजे यांनी खबर दिली. त्यानंतर चुडावा पोलिसांनी आकस्मात मृत्यू क.१२)२०२५ नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मरणाचे कारण अद्याप अस्पष्ट असून, हा अपघात आहे की हत्या, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.तपास पोउपनि श्री. मुखेडकर करीत आहेत.या प्रकरणामुळे कावलगाव परिसरात भितीचे व वातावरण आहे. शेतात प्रेत सापडल्याने गावकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.


You cannot copy content of this page