भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांना “हिमालयीन योगा वर्ल्ड पिस” पुरस्कार

Spread the love

पूर्णा १८ जून (प्रतिनिधी)

उत्तराखंड राज्यातील लेह लडाख येथे जागतिक योगा व मेडीटेशन उत्सव-२०२५ निमित्ताने पार पडलेल्या कार्यक्रमात पूर्णा येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष, भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांना “हिमालयीन योगा वर्ल्ड पिस” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

महाबोधी इंटर नॅशनल मेडिटेशन सेंटर (MIMC) मध्ये ता.१५ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिहारचे राजयपाल महामहिम आरिफ महम्मद खान कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाबोधी इंटर नॅशनल मेडिटेशन सेंटर, लेह-लडाखचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना आदीं मान्यवरांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांना “हिमालयीन योगा वर्ल्ड पिस” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”योगा व विपस्सना” बद्दल समायोचित भाषण झाले या कार्यक्रमासाठी भारत-नेपाळचे राजदूत डॉ. शंकरप्रसाद शर्मा, लडाखचे खासदार हाजी हानिफा जन, डॉ. सदनामसिंग संधु (राज्यसभा सदस्य तथा चंडीगड विद्यापिठाचे कुलगुरू) तसचे लडाख बुध्दीस्ट असोसिएशनचे प्रसिडेंट मा.श्रींग डोरजे लकरूक, मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय भारत सरकारचे डॉ. राधेंद्र रॉय, डायरेक्टर, हेल्थ सर्विसेस लडाखचे डॉ. ताशी थिनर्लेस, हिमांशु सोनी सिने अभिनेता-मुंबई, व्हाईस चॅन्सलर लडाखचे प्रोफेसर पुष्पा, अॅडिशनल सेक्रेटरी U.T. लडाख विक्रमसिंग मलिक व इत्यादी मान्यवर उपस्थिन होते.

You cannot copy content of this page