वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक रणधुमाळी;लोकनेते गोपीनाथजी मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवार परभणीतील सभासदांच्या भेटीला
परळी वैजनाथ या.२ (प्रतिनिधी)वैद्यनाथ को – ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी परभणी जिल्ह्य़ातील वैद्यनाथ बँकेच्या सभासद मतदारांच्या भेटी घेतल्या. सोनपेठ, पाथ्री, परभणी आणि गंगाखेड आदी ठिकाणी मतदारांच्या भेटी देऊन भूमिका विषद केली. यावेळी ठिकठिकाणी सभासदांनी उमेदवारांचे जोरदार स्वागत केले. तर परभणी जिल्ह्यातून एकही मतदान बाहेर जाणार नाही अशी ग्वाही माझी आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली.
येत्या 10 ऑगस्ट रोजी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार आहे. यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवार विद्यमान अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेशराव कराड, विजयकुमार वाकेकर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, माहेश्वर निर्मळे, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री यांनी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पाथ्री, परभणी आणि गंगाखेड आदी ठिकाणी मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारांनी उमेदवारांचे ठीक ठिकाणी स्वागत करून “आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशी ग्वाही दिली. परभणी येथे माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या उपस्थितीत मतदारांची बैठक झाली. यावेळी वरपूडकर यांनी “परभणी जिल्ह्यातील एकही मतदान बाहेर जाणार नाही अशी ग्वाही देऊन ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी परभणी जिल्हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देईल” असा विश्वास व्यक्त केला.

परभणी येथे झालेल्या बैठकीला महानगर अध्यक्ष भाजपा शिवाजीराव भरोसे, महानगर अध्यक्ष भाजपा, माजी शहर उपाध्यक्ष विजय दराडे, महानगर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गणेश(बबलू) टाक, चार्टर्ड अकाऊंट विजय मुंदडा, शाखा सल्लागार.सुरेंद्र बठिया, अशोक राका, ॲड. शिवाजीराव आहेर, ॲड. मिलिंद यादव (वकील सल्लागार) यांच्यासह सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
—————————————————
गंगाखेड येथील बैठकीत बोलताना माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे यांनी गंगाखेड परिसरातील सर्वच्या सर्व मतदान हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनललाच होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. बैठकीला माजी नगरसेवक मनोहर केंद्रे, कॉंग्रेसचे अॅड. संतोष मुंढे, व्यापारी अनिल यानपल्लेवर, जि. प. सदस्य भगवान सानप, माजी नगरसेवक राजेंद्र लोढा, डॉ. संजय भरड आदींची उपस्थिती होती. सोनपेठ येथील प्राचार बैठकीला बाबासाहेब फले, लक्ष्मीकांत धोंडे, बालासाहेब हरकळ, दत्तात्रय भाडुळे, सुरेश रेवडकर, रामराव कोपनर, प्रभाकर कदम यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————-पाथरी येथील बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला. या बैठकीत बोलताना योगेश्वर शुगर इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित देशमुख यांनी सांगितले की, वैद्यनाथ बँकेवर सामान्य जनतेचा विश्वास आहे आणि तो विश्वास संचालक मंडळाने सार्थ ठरविला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही 100 टक्के मतदान हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनललाच होणार आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अच्युत महाराज शिंदे, उद्धव नाईक, शिवाजी नाईक, गंगाधर सनकर, विजय पौरवाल, पी. डी. पाटील, विजयकुमार सिताफळे, सर्जेराव गिराम, दीपक कुलकर्णी, अशोक गिराम, महादेव जोगदंड, अॅड. श्रीपाद कोंत, नाना टाकळकर, माणिक घुमरे, उत्तम रासवे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.












