वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा-तालुका पदाधिकाऱ्यांच्या परभणीत मुलाखती-प्रभारी जि.अ.मगरें यांची माहिती

Spread the love

परभणी ता.२६ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, तालुका तसेच शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असून नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी पदाधिकारी निवडीच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.या मुलाखती 28 व 29 सप्टेंबर 2025 रोजी सावली विश्रामगृह, वसमत रोड, खानापूर फाटा, परभणी येथे होणार आहेत. या मुलाखतींना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा समन्वयक आदरणीय अशोक भाऊ सोनोणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा, तालुका माजी पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडी पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलाखतीत सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी परभणीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page