नांदेड-मुंबई ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचे टिकीट बुकींग सुरू;वाचा काय आहेत दर..!

Spread the love

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आँनलाईन पद्धतीने मिळतेय टिकीट

पूर्णा ता.१७(प्रतिनिधी)

रेल्वे बोर्डाने नांदेड पर्यंत विस्तार केलेल्या मुंबई-जालना ‘वंदेभारत’ एक्सप्रेस(ता.२८) आॅगस्ट पासून चालवली जाणार आहे. या गाडीचे आँनलाईन टिकीट बुकींग रेल्वेच्या IRCTC संकेतस्थळावर ता.१५ जुलै पासून सुरू करण्यात आले असल्याची माहिती आहे.त्यामध्ये नांदेड व परभणीसह मार्गावरील रेल्वे स्थानकापासून ते मुंबईचे चेअरकार व ईकाॅनामी क्लासचे दर दर्शवले आहेत.

      दमरेच्या नांदेड नांदेड विभागातून ता.२६ आॅगस्ट रोजी मुंबईला जाणाऱ्या पहील्या वंदेभारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी मिळणार आहे.(ता.२८) आॅगस्ट रोजी पासुन ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून दादर, ठाणे,कल्याण, नाशिक,मनमाड, छत्रपती संभाजी नगर, जालना,परभणी या मार्गाने नियमितपणे गुरुवार वगळता नांदेड येथून तर बुधवार वगळता मुंबई येथून धावणाऱ्या गाडीने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.रेल्वे विभागाच्या वतीने IRCTC या संकेतस्थळावर गाडीचे आँनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग सुरु केले आहे. परभणीहुन मुंबई साठी तिकिट दर चेअरकार चे दर १ हजार १०९ रुपये तर ईकाॅनामी क्लासचे दर २ हजार ७९५ रुपये असणार आहेत.तर जालना करीता ४७५/- , छत्रपती संभाजीनगर करीता ५८५/- मनमाड ८९०/- नाशिक रोड १००५/- व मुंबई रु.११०९ असे चेअर कार क्लासचे दर असणार असल्याची माहिती आहे.

You cannot copy content of this page