विलास शिंदे खुन प्रकरणातील दोघांना बुधवार पर्यंत पोलिस कोठडी

Spread the love

पुर्णा तालुक्यातील कळगांव येथे शेत रस्त्याच्या वादातून घडली होते हत्याकांड;ताडकळस पोलीस हद्दीतील घटना

पुर्णा ता.१(प्रतिनिधी) Tadkalas Police News परभणीच्या पुर्णा तालुक्यातील मौजे कळगांव शिवारातील विलास शिंदे नामक ५० वर्षाच्या शेतकऱ्यांचा शेत रस्त्याच्या वादातून खुन झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २९)रात्री घडली होती.या प्रकरणात पोलिसांनी कुबेर माने,कैलास उर्फे बाळू होणमने यास ताब्यात घेऊन जेरबंद करत मा.पुर्णा न्यायालयासमोर Honebal Purna Court हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेत रस्त्याच्या वादातून पुर्णा तालुक्यातील कळगांव येथील गट नंबर १६९ मधील शेतकरी विलास शिंदे या शेतकऱ्यांस चाकूने सपासप वार करून खून केला होता.Vikas Shinde Murder Case Kalgav Tq.Purna तसेच त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी सिंदुबाई शिंदे, व सुष्ना जयश्री शिंदे यांना देखील बेदम मारहाण केली होती.
या प्रकरणी ताडकळस पोलीसांत मयत विलास शिंदे यांचा मुलगा चंद्रकांत शिंदे यांनी कुबेर दादाराव माने रा.कळगाव, कैलास उर्फे बाळू साहेबराव होणमने रा.ताडकळस यांच्या विरोधात गुरनं २२५/२५ कलम १०३(१),११८ (१),(२),३(५)भा.न्या.संहीता नुसार गुन्हा दाखल केला होता.ताडकळस पोलीसांनी शनिवारी (ता.२९) रोजी दोघांना जेरबंद करून मा.पुर्णा न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची बुधवार (ता.३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास ताडकळस पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page