पूर्णेत विशाल कदम यांचेकडून ईफ्तारपार्टीचे आज आयोजन

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.रमजान महीन्यात उपवास करणा-या मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना नेते मा.नगराध्यक्ष विशाल कदम यांनी आज शुक्रवारी २८ रोजी सायं ६;३० वा.जामामस्जीद येथे ईफ्तारपार्टीचे आयोजन केले आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव जनकल्याणासाठी कडक उपवास करतात.श्रृणाणुबंध, सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी अनेक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात ईफ्तारपार्टीचे आयोजन करण्यात येते.पूर्णेचे मा.नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते विशाल कदम यांनी पूर्णा व परीसरातील तमाम मुस्लिम बांधवांसाठी शुक्रवार ता.२८ रोजी सायं ६:३० वाजता भव्य ईफ्तारपार्टीचे आयोजन केले आहे.या ईफ्तारपार्टीला मुस्लिम तसेच हिंदू समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या ईफ्तारपार्टीला सर्व मुस्लिम बांधवांनी अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक विशाल कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page