उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नांदेड येथे विशाल कदमांचा शिवसेनेत पक्षप्रवेश..!

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)
येथील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा पूर्णा पालीकेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम हे गुरूवार ता.६ फेब्रुवारी नांदेड येथील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.त्यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला असल्याचे समजते.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी सलग दोन वेळा ठाकरे गटाकडून गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एक लाख पंधरा हजार मते घेऊनही त्यांचा पराभव झाला होता.निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या सह कार्यकर्तेही अस्वस्थ झाले होते.
मागील महिन्यापासून ते शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.परंतु या चर्चेस त्यांनी अधिकृत दुजोरा दिला नव्हता.नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावरील आपल्या अकाऊंटवरील ठाकरे गटाचा प्रोटोकॉल सह जिल्हा प्रमुख पदाचा उल्लेख तसेच मशाल चिन्ह हाटवत त्यांनी उद्धव ठाकरे गटाला जयमहाराष्ट्र ठोकण्याचा इशारा दिला होता. नांदेड येथे गुरुवारी ६ रोजी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या आभार मेळाव्यात ते आपल्या हजारो समर्थकांसह पक्ष प्रवेश करत हाती धनुष्यबाण घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्यांच्या सोबत परभणी जिल्ह्यातील परभणी,पूर्णा,पालम, गंगाखेड तालुक्यातील ठाकरे गटाचे काही आजीमाजी लोकप्प्ररतिनिधी प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासोबत पक्ष प्रवेश करणार, त्यांनी नावे मात्र अद्याप समजू शकले नाही.. ठाकरे गटाकडून शिवसेना शिंदे गटाकडे त्यांच्या होणाऱ्या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You cannot copy content of this page