Purna Newsनोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे-कैलासराव देसाई
पूर्णेच्या विद्या प्रसारणी शाळेत जगण्याच्या पाऊलवाटा संवादसत्र कार्यक्रम
पूर्णा ता.१६(प्रतिनिधी) Purna VPS School Newsजीवनात पैसा महत्त्वाचा नसून ज्ञान व संस्कार महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी संस्कारित बनावे, चांगले काय आहे,याचा शोध घ्यावा. नकारात्मकता सोडून सकारात्मक बनावे,आवडत्या विषयात,व्यवसायात स्वतःला झोकून द्यावे, नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा.असा उपदेश (Andres and housar India private Ltd)एन्ड्रेस & हाऊसर इंडिया कंपनीचे कार्यकारी संचालक कैलासराव देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.
पुर्णा येथिल विद्या प्रसारिणी सभा, शाळेत(Vidya Prasarani Sabha School Purna)जगण्याच्या पाऊलवाटा संवाद सत्र- २ अंतर्गत “उद्योग व्यवस्थापन- मनुष्यबळाची पाऊलवाट”या विषयावर शनिवारी (ता.१६) रोजी ईयत्ता ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कैलासराव देसाई बोलत होते.प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.विनय वाघमारे,प्रमुख अतिथी श्रीनिवास काबर, साहेबरावजी कदम, डॉ. हरिभाऊ पाटील आदींची उपस्थिती होती.पुढे कैलास देसाई यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मुलांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा. कारण व्यवसायाच्या माध्यमातून आपण इतरांना नोकरी देऊ शकतो, अनेक घरे उभारू शकतो. जिद्द, चिकाटी, मेहनत, शिस्त याद्वारे निश्चित ध्येय गाठा असा संदेश त्यांनी मुलांना दिला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताच्या माध्यमातून केले.पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक देविदास उमाटे यांनी केले तर सूत्रसंचालन मुंजाजी मोरे व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक भगवान ढोणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका आतिया मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवदर्शन हिंगणे,सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले.












