फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून १ कोटी ३६ लाखांची वसुली
९ तपासणी मोहीमेत २३ हजार ४८० प्रवाशांवर कारवाई;
पूर्णा/प्रतिनिधी
नांदेड विभागातील भरारी पथकाने रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २३ हजार ४८० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करत ज्यात जवळपास १ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई एप्रिल महिन्यात रेल्वेच्या ९ तपासणी मोहीमेला विविध पथकाने केली आहे.
नांदेड रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि अनधिकृत रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वे विभाग नियमित पणे तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. एप्रिल महिन्यात नांदेड रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामले, यांच्या मार्गदर्शनाखाली ९ तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आल्या यामोहीमेत डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक , श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक-I आणि श्री एन. सुब्बा राव , सहायक वाणिज्य व्यवस्थापक-II यांनी या तिकीट तपासणी मोहिमेत महत्वाचा सहभाग घेतला. या तपासणीत विविध ठिकाणी आणि विविध रेल्वे गाड्यांमध्ये छोट्या छोट्या टीम बनवून धाडी टाकण्यात आल्या, तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २३ हजार ४८० फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करत ज्यात जवळपास १ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.या मोहीमेत नांदेड विभागातील तिकीट तपासनीस, वाणिज्य निरीक्षक आणि वाणिज्य कार्यालयातील कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घेतला आणि तिकीट तपासणीच्या कामात मदत केली. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
टिकीट घेऊनच प्रवास करावा -डिआरएम कामलेप्रवाशांनी रेल्वे प्रवासात आरक्षीत विना आरक्षीत गाड्यांतुन प्रवास करताना योग्य तिकीट घेवूनच रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करावा आणि दंडात्मक कार्यवाही टाळावी.असे आवहान रेल्वे विभागाच्या वतीने विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी केले आहे.