पूर्णेत पावसाची संततधार ;झिरोफाटा-पूर्णा रस्ता वाहतुकीसाठी बंद..
हवामान खात्याचा ईशारा ४८ तास धोक्याचे; तालुक्यात दोन दिसांपासून सुर्यदर्शन नाही
पूर्णा ता.२६(प्रतिनिधी)
उघडदीप दिलेल्या पावसाने तब्बल दिड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी ता.२५ रोजी सायं हजेरी लावली. मात्र जोर शनिवारी सकाळपासून धरला.या पावसाने झिरोफाटा- पूर्णा रस्त्यावरील माटेगांव येथे थुना नदीचं पाणी पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या पर्यायी रस्त्या वरुन वाहत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये समाधान कारक पाऊस झाला असल्याची माहिती आहे.
पूर्णा तालुक्यात जवळपास दिड महीना पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे बळीराजा चिंता दूर झाला होता.शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतातील खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. सायंकाळपर्यंत उशिरा सुरू होता सकाळपासून पाऊस सुरू झाल्यामुळे यंदाच्या मोसमात ओढे, पाझर तलाव,नद्या,नाले ओसंडून वाहत आहेत.तालुक्यातुन वाहणाऱ्या पूर्णा, गोदावरी नदीच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे.त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. तर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे झिरोफाटा ते पूर्णा, रस्ता माटेगाव रस्ता बंद झाला आहे.दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.पोलीस तसेच सा.बां विभागाकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सुचित केले असल्याचे सा.बां. विभागाचे अधिकारी संजय देशपांडे यांनी सांगितले.जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत कोणीही येथून प्रवास करणे टाळावे असे त्यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील चुडावा कावलगांव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.श्रावण सरी नंतर श्रावणामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.दरम्यान झालेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी लाभदाय ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत असून,येलदरी जलाशयात ६७.१२ टक्के तर सिद्धेश्वर जलाशयात ४०.७० टक्के भरले आहे.
हवामान विभागाने पुढील ४८ तासात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा ईशारा दिला असल्याने तहसील प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांना सुचना दिल्या आहेत.आगामी काळात अतिवृष्टी होत असल्यामुळे परिस्थितीवर प्रशासनाची बारीक लक्ष असल्याचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.